Manoj-Naravane 
देश

सौदी अरेबिया,युएईबरोबर लष्करी सहकार्य वाढणार; लष्करप्रमुखांकडून प्रथमच दौरा 

पीटीआय

नवी दिल्ली - लष्करप्रमुख मनोज नरवणे सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकताच संयुक्त अरब अमिराती (युएई) चाही दौरा केला. यावेळी उभयंतात दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढविण्यासह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. या देशांना भेट देणारे ते पहिलेच भारतीय लष्करप्रमुख आहेत, अशी माहिती लष्कराने ट्विटद्वारे दिली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांनी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाला भेट दिली. यावेळी जनरल फयाद बिन हमीद रुवैली व ले.जनरल मुतलाक बिन सालिम बिन अल-अझिमा यांच्याशी चर्चा केली. अझिमा हे सौदी अरेबियाच्या जॉईंट फोर्सचे कमांडर आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये ही भेट झाली. यावेळी दोघांनी संरक्षण सहकार्यावर आपली मते व्यक्त केली. त्यापूर्वी नरवणे यांनी नऊ व दहा डिसेंबरला युएईचा दौरा केला. यात त्यांनी भारत - युएईमधील संरक्षण संबंध वृद्धिंगत करण्याबद्दल वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला. गेल्याच महिन्यात परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी युएईचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भारत व युएईमधील धोरणात्मक भागीदारीवर चर्चा केली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT